व्ही. करमबीर सिंह होणार नवे नौदल प्रमुख

मुंबईःपूर्व नौदल कमांडचे सध्याचे कमांडर व्हाइस अॅडमिरल व्ही. करमबीर सिंह नवे नौदल प्रमुख होणार आहेत. ३१ मे रोजी विद्यमान नौदल प्रमुख सुनील लांबा निवृत्त होणार असून, त्याच दिवशी करमबीर सिंह पदभार स्वीकारणार आहेत. करमबीर सिंह सध्या विशाखापट्टनम येथे पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. १९८० मध्ये त्यांनी नौदलात आपली सेवा बजावण्यात सुरुवात केली. १९८२ मध्ये ते वैमानिक बनले. चेतक आणि कामोव हेलिकॉप्टर उड्डाणाचा त्यांचा अनुभव दाणगा आहे. नौदलातील आपल्या ३९ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

महाआघाडीचा एल्गार; विखे मात्र गैरहजर!

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेना युतीपुढे तगडं आव्हान उभं करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक छोट्या पक्षांना सोबत घेऊन 'संयुक्त पुरोगामी महाआघाडी' उभारत एल्गार पुकारला असून महाआघाडीच्या पहिल्याच आणि महत्त्वपूर्ण अशा संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील गैरहजर राहिल्याने 'विखेंचं नेमकं काय चाललंय?' ही चर्चा नव्याने रंगू लागली आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, रिपाइंचे (गवई गट) राजेंद्र गवई, जोगेंद्र कवा

Congress-NCP: काँग्रेस २४, राष्ट्रवादी २० जागा लढणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी संयुक्त पुरोगामी महाआघाडीचं राज्यातील जागावाटप निश्चित झालं असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली.राज्यातील ४८ जागांपैकी २४ जागांवर काँग्रेस लढणार असून २० जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे, असे अशोक चव्हाण यांनी नमूद केले. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला २, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला १ आणि युवा स्वाभिमान पक्षाला १ जागा देण्यात आली आहे, असेही चव्हाण यांनी पुढे स्पष्ट केले.

Filmfare Awards 2019: हेमामालिनी यांना जीवनगौरव

म. टा. प्रतिनिधी, मुंबईतमाम हिंदी सिनेसृष्टी ज्या सुवर्णक्षणांची वाट पाहत होती, ते क्षण शनिवारी रात्री बांद्रा येथील जिओ गार्डनमध्ये अवतरले. '६४ वा विमल इलायची फिल्मफेअर पुरस्कार २०१९' हा झगमगता सोहळा दणक्यात पार पडला. बॉलिवूडची सध्याची चर्चेतली जोडी रणबीर कपूर व आलिया भट्टनं फिल्मफेअरवर आपले नाव कोरले.

नोटा ओळखण्यासाठी अंधांना मोबाइल अॅप

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईनोटबंदीनंतर नव्याने चलनात आलेल्या नोटा अंध व्यक्तींना सहजगत्या ओळखता याव्यात याकरिता मोबाइल अॅप विकसित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे (आरबीआय) शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.नोटबंदीनंतर नव्याने चलनात आलेल्या नोटा व नाण्यांमध्ये ते किती मूल्याचे आहेत, हे स्पर्शाने ओळखण्यासाठी आवश्यक वैशिष्ट्ये नाहीत, असे निदर्शनास आणत नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड (नॅब) या संस्थेने अॅड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत जनहित याचिका केली आहे.