साहित्यिक डॉ. यशवंत पाठक यांचे निधन

नाशिकसंत साहित्याचे अभ्यासक, साहित्यिक प्रा. डॉ. यशवंत पाठक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी ज्योत्स्ना, विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. पाठक हे कवी किशोर पाठक यांचे ज्येष्ठ बंधू होत.मनमाड येथील महात्मा फुले महाविद्यालयातून विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्यानंतर सुमारे ९ वर्षे डॉ. पाठक यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यासनाचे काम पूर्ण केले. डॉ. पाठक यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जल आटले, संकट दाटले!

मार्चअखेरपर्यंतची पाणी स्थिती...जिल्ह्यातील जलसाठा (दशलक्ष घनफूट)वर्ष २०१८.....२९ हजार ५३५वर्ष २०१९... १६ हजार ९६२ ...गंगापूर धरण समूहातील साठावर्ष २०१८.....६३ टक्केवर्ष २०१९... ४० टक्के ...गंगापूर धरणातील साठावर्ष २०१८.....६८ टक्केवर्ष २०१९... २७ टक्के...म. टा. प्रतिनिधी, नाशिक 'जल है तो कल है' हे ब्रीद खरे असले तरी शहरासह अनेक भागात पाण्याची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी सुरूच आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये तब्बल २० टक्के पाणीसाठा कमी असून, त्यामुळे काही दिवसांतच पाणीटंचाईच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता बळावली आहे.

बांधकामाचे जुने प्रस्ताव ऑफलाइन स्वीकारणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक ऑटो डीसीआरमुळे अडचणीत आलेले बांधकामाचे जुने प्रस्ताव अखेरीस दुरुस्तीसह ऑफलाइन स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे. ऑटो डीसीआर प्रणाली सुरू झाल्यानंतर त्या अगोदरचे प्रस्ताव कसे स्वीकारणार याबाबत विकासकांमध्ये संभ्रम होता. याबाबत निर्णय झाल्यामुळे विकासकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे तरी विकासक आणि वास्तुविशारदांना थोडासा दिलासा मिळाला आहे. महापालिकेत ऑटो डीसीआर प्रणाली सुरू झाल्यापासून अनेक अडचणी येत असून, त्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित होती. ऑटो डीसीआरमध्ये दाखल होऊ न शकलेली किमान जुनी प्रकरणे तरी ऑफलाइन घ्यावी, अशी विकासकांची मागणी होती.

मनसे-राष्ट्रवादीत खलबते

मतदारांना राष्ट्रवादीकडे वळविण्याचे मनसेसमोर आव्हानम. टा. खास प्रतिनिधी, नाशिकमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली. भारतीय जनता पक्ष नको, असे सांगत त्यांनी मनसैनिकांना विरोधी पक्षाकडे वळण्याचा सल्ला दिला. मनसेचे अस्तित्व नाशिकसह मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरात असून, येथील मतदारांना राष्ट्रवादीकडे वळविण्याचे आव्हान मनसैनिकांना पेलावे लागणार आहे.नाशिक महापालिकेत आपले अस्तित्व कायम ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या मनसेने यापूर्वी लोकसभा निवडणूक लढविली आहे. मात्र, त्यात त्यांना यश मिळाले नाही.

मारहाणप्रकरणी दोघांना चार वर्षे सक्तमजुरी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकआडगाव नाका येथील एका बारमधील मॅनेरजरला मारहाण करीत गंभीर दुखापत करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघा आरोपींना अतिरिक्त मुख्य न्यायाधीश पांडुरंग घुले यांनी चार वर्षे सक्तमजुरी व हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.सागर गरड, विकी शिंदे (रा. नाग चौक, पंचवटी) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना २३ जानेवारी २०१३ रोजी आडगाव नाका येथे दुपारी घडली होती. या प्रकरणी पल्लवी बारचे मॅनेजर मनोज साळुंके यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. २३ जानेवारी २०१३ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गरड व शिंदे हे दोघे आरोपी हॉटेलमध्ये आले होते.