ashok chavan: 'मी राजीनाम्याच्या विचारात...' अशोक चव्हाणांची कथित ऑडिओक्लिप व्हायरल

चंद्रपूर'माझे पक्षात कुणी ऐकत नाही ..., मीही राजीनाम्याच्या विचारात आहे', अशा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कथित वक्तव्याची ऑडिओक्लिप ऐन निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल झाल्याने काँग्रेस पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे. आपण असे वक्तव्य केले असल्याचे चव्हाण यांनी स्पष्टपणे कबूल केले नसले, तरी या कथित संभाषणाचा अशोक चव्हाण यांनी इन्कारही केलेला नाही. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात मतभेद असून, याबाबत आपले मत उघड करणाऱ्या एका काँग्रेस कार्यकर्त्याशी बोलताना चव्हाण यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.

आंबेडकर सोलापुरातून लढणार

म. टा. वृत्तसेवा, अकोला वंचित बहुजन आघाडीच्या राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर करताना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला आणि नागपूरच्या जागेविषयीचा सस्पेन्स कायम ठेवला. मधल्या काळात लक्ष्मण माने यांनी अॅड. आंबेडकर सोलापुरातून लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याविषयी अधिकृतरित्या सांगण्यात आले नाही. पण, अॅड. आंबेडकर हे सोलापुरातूनच लढणार असल्याचे शुक्रवारी त्यांचा मुलगा सुजात यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 'अब की बार सोलापूर का खासदार, आंबेडकर का वारसदार,' असा नाराही दिला. अकोला लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक निवडणूक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांभोवती फिरत असते. अॅड.

नागपुरातून गडकरी, रामटेकमधून तुमाने

युतीचे उमेदवार जाहीरम.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरनागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अपेक्षेनुसार उमेदवारी जाहीर झाली. त्यापाठोपाठ शिवसेनेने रामटेकमधून कृपाल तुमाने यांना परत संधी दिली. युतीने विदर्भातील विद्यमान खासदारांना कायम ठेवले, हे विशेष.होळीमुळे भाजपची यादी शुक्रवारी येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असतानाच गुरुवारी सायंकाळी यादी येणार असल्याचे वृत्त पसरले आणि सर्वांचे लक्ष दिल्लीकडे लागले. धुळवडीच्या रात्री भाजपची यादी तर, शुक्रवारी दुपारी सेनेची यादी आली. नितीन गडकरी दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.

कर्ज काढून साजरी केली होळी

म.टा. प्रतिनिधी, नागपूरहोळी, धुळवड हा सण सर्वत्र उत्साहात साजरा झाला असताना आमदार निवसाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांची होळी मात्र पैशांअभावी गेली. वेतनच जमा न झाल्याने आम्हाला पैसे उधार घेऊन सण साजरा करावा लागल्याचा रोष सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. आमदार निवासाच्या देखभालीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे ६० कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन १० तारखेच्या आतच होते. मात्र यंदा २२ मार्च येऊनही त्यांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाही. वरिष्ठांकडे वारंवार विनंती करून आपल्या हक्काचे वेतन मागण्याची वेळ या कर्मचाऱ्यांवर आली आहे.

नामांकनातून नेत्यांचे शक्तिप्रदर्शन

तीन मतदारसंघांवर मंथनच!लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी २५ मार्च ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुटीचे आल्याने केवळ सोमवार हा एकमेव दिवस उमेदवारांना मिळणार आहे. तरीही भंडारा-गोंदिया, अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यातील उमेदवारीवर एकमत झालेले नाही. एकीकडचे हे चित्र असतानाच वर्धा मतदासंघातील काँग्रेस आणि भाजपच्या दोन्ही नेत्यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केले. गडचिरोलीतून काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांनी अर्ज भरला. उसेंडी यांच्यासाठी तीन गटात विभालेले काँग्रेस नेते एकत्र आले होते.