‘सेक्रेड...’मध्ये अमृता?

अभिनेत्री अमृता सुभाषनं हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता 'सेक्रेड गेम्स' या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा भाग येत असून, त्यात ती चमकणार असल्याचं कळतंय. यात ती नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर काम करत असून, दक्षिण आफ्रिकेत या दुसऱ्या भागाचं शूटिंग झाल्याचं कळतं. या वेबसीरिजच्या शेड्यूलमध्ये पंकज त्रिपाठीही होते म्हणे. यापूर्वी 'रमन राघव २.०'मध्ये तिनं नवाजुद्दीनसोबत काम केलं होतं. अमृताच्या अभिनयाची पुन्हा एकदा चर्चा होणार हे नक्की.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कतरीना करतेय वर्ल्डकपची तयारी !

काही कलाकार क्रिकेटसाठी वेडे असतात. कतरीना कैफनं क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला होता. 'भारत' चित्रपटाच्या सेटवर क्रिकेट खेळतानाचा हा व्हिडिओ होता. 'पॅकअपनंतर क्रिकेट खेळले, कारण विश्वचषक जवळ आला आहे' अशी ओळ तिनं लिहिली होती. आपल्या बॅटिंगमध्ये मी आणखी सुधारणा करणार आहे, असं ती म्हणते. त्यावर, 'अशी कोणतीही गोष्ट नाही की जी तू करू शकत नाहीस' असं अनुष्कानं तिच्या या व्हिडीओवर लिहिलंय.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालिकेची 'तिसरी' गोष्ट

चैताली जोशीशनाया, कियारा, मायरा, दीपिका, लक्ष्मी... ही सगळी नावं सध्या प्रेक्षकांच्या तोंडी आहेत. दोघांमध्ये आलेली ही ‘तिसरी’ टीव्हीवर सध्या चर्चेत आहे. तिच्या येण्यानं मालिका मसालेदार होत आहेत. प्रेमाचा त्रिकोण असलेल्या मालिकांमधलं हे चित्र प्रेक्षकांना परचित आहे. ‘दोघात तिसरा...’ या रुजलेल्या ट्रेंडमध्ये एक मुद्दा मात्र ठळकपणे दिसून येतोय; तो म्हणजे ही तिसरी व्यक्ती महिला व्यक्तिरेखा आहे. जुन्या सिनेमांमध्ये ‘एक फुल दो माली’ असं असायचं. छोटा पडदा मात्र ‘दो फुल एक माली’वर चालताना दिसतोय. शेजाऱ्याच्या घरात काय सुरू आहे याबाबतचं कुतूहल हे मानवी स्वभावातच आहे.

आर. माधवनचा हा लुक पाहिलात का?

मुंबई :अभिनेता आर. माधवन लवकरच ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपासून चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. यातील त्याचा लूक पाहून त्याला ओळखणे कठीण आहे. चेहऱ्यावर चक्क पांढरी दाढी, पांढरे केस, वाढलेले वजन अशा वेगळ्याच लूकमध्ये तो चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड चालू आहे, ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’हा चित्रपट इस्रोमधील ज्येष्ठ वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे.

वडिलांनी घेतलेल्या कर्जामुळं शिल्पा शेट्टी अडचणीत

मुंबई: वडिलांनी घेतलेल्या कथित कर्जामुळं अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिच्या कुटुंबीयांना न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ आली आहे. येत्या २९ जानेवारीला या प्रकरणी शिल्पा शेट्टी हिला न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे.एका ऑटोमोबाइल कंपनीचे मालक परहद आमरा यांनी या संदर्भात शेट्टी कुटुंबीयांविरोधात तक्रार केली आहे. शिल्पाचे वडील सुरेंद्र शेट्टी यांनी आमरा यांच्याकडून २१ लाखांचं कर्ज घेतलं होतं. शेट्टी कुटुंबीयांनी आमरा यांचा हा दावा साफ नाकारला आहे. त्यामुळंच हा वाद न्यायालयात पोहोचला आहे.
67657097