चौथी भिंत: संकुचित आशयाचं देखणं सादरीकरण

>> जयंत पवार'सोयरे सकळ' हे नाटक तीन पिढ्यांची गोष्ट सांगतं आणि त्यात 'परंपरा' हे मध्यवर्ती आशयसूत्र बनवतं. याचाच अर्थ या नाटकाचा पैस मोठा आहे आणि ते गंभीर आहे. त्यामुळे ते काय सांगू बघतंय, हे बघणं महत्त्वाचं होऊन बसतं. परंपरा जपणं-परंपरा नाकारणं-परंपरेचा नवा अर्थ गवसणं असं जे महत्त्वाचं आशयसूत्र नाटक मांडतं त्याच्या गाभ्याशी गेल्यावर कळतं की परंपरेचा एक मर्यादित आणि आजच्या काळात संकुचित ठरणारा आशय किंवा त्याचं नाट्यविधान हे नाटक करू मागतंय. त्यामुळे एक मोठा आव आणून सांगितलेली छोटी गोष्ट इतपतच त्याचं स्वरूप मर्यादित होतं - पण हे आशयाच्या बाबतीत.

कलाकारांनी रंगवलेली फँटसी

चौथी भिंत : चल तुझी सीट पक्की…दर्जा : तीन स्टार…जयंत पवारयमाने किंवा यमदूताने पृथ्वीतलावर यावं आणि मर्त्य मानवाच्या निर्वाणात यमाच्या नोंदीत काही तरी गफलत व्हावी, ही लेखकांची लाडकी फँटसी आहे. नाटकापासून सिनेमापर्यंत ती विनोदी अंगाने भरपूर वापरली गेली आहे. 'चल तुझी सीट पक्की' या नाटकात पुन्हा एकदा ती अवतरते. वास्तविक अनेकवेळा वापरलेल्या कल्पनेतली गंमत जवळपास संपलेली असते. पण 'तुझी सीट पक्की' या नाटकामध्ये ह्या फँटसीतली गंमत लेखक-दिग्दर्शक कायम ठेवण्यात आणि कलावंत ती वाढवण्यात सफल होतात. एका परिचित फँटसीचा मनोरंजक प्रवास या नाटकात पाहायला मिळतो.

रेनबोवाला ठरली पारंगत

सूरज कांबळे, एमडी कॉलेजप्रयोगशील ठरलेल्या स्पर्धात्मक कलामंचावर गेली अनेक वर्षं अनेक एकांकिका या सादर होत आहेत आणि होत राहतील, या प्रयोगशीलतेचा गौरव करण्यासाठी काही वर्षांपूर्वी एकांकिका जगातील कलाकारांना आणि तंत्रज्ञांसाठी अस्तित्वतर्फे 'पारंगत सन्मान'ची सुरुवात करण्यात आली. वर्षभरात गाजलेल्या आणि विविधांगी एकांकिकेचा, त्यातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींना या पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात येतं. तब्बल सहा वर्षांनी अस्तित्व या संस्थेनं यंदा या सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं होतं. याचं स्वागत एकांकिका संघ आणि कलाकार यांनी केलं.

पुन्हा ‘लालबाग परळ’

सुरज कांबळे, कॉलेज क्लब रिपोर्टरलालबाग-परळ भागात राहणारा कामगार वर्ग, त्यांचं जगणं, त्यांच्या व्यथा मांडणारं 'अधांतर'सारखं नाटक, 'लालबाग परळ' हा सिनेमा खूप गाजला. लालबाग परळमध्ये राहणारी गिरणी कामगारांची एक पिढी आता संपली अशी चर्चा असतानाच त्यांच्या पुढच्या पिढीची गोष्ट सांगणारं एक नवंकोरं प्रायोगिक नाटक रंगभूमीवर दाखल झालं आहे. आजच्या पिढीची गोष्ट सांगणाऱ्या या नाटकाचं नाव 'तोडी मिल फँटसी' असं असून, सुजय जाधव या तरुण लेखकानं नाटकाची गोष्ट लिहिली आहे.

पुन्हा 'लालबाग-परळ'

सूरज कांबळे, एमडी कॉलेज
muntainbox@gmail.com
लालबाग-परळ भागात राहणारा कामगार वर्ग, त्यांचं जगणं, त्यांच्या व्यथा मांडणारं 'अधांतर'सारखं नाटक, 'लालबाग परळ' हा सिनेमा खूप गाजला. लालबाग परळमध्ये राहणारी गिरणी कामगारांची एक पिढी आता संपली अशी चर्चा असतानाच त्यांच्या पुढच्या पिढीची गोष्ट सांगणारं एक नवंकोरं प्रायोगिक नाटक रंगभूमीवर दाखल झालं आहे. आजच्या पिढीची गोष्ट सांगणाऱ्या या नाटकाचं नाव 'तोडी मिल फँटसी' असं असून, सुजय जाधव या तरुण लेखकानं नाटकाची गोष्ट लिहिली आहे. विनायक कोळवणकर या तरुण दिग्दर्शकानं नाटकाचं दिग्दर्शन केलंय.