मालिकेची 'तिसरी' गोष्ट

चैताली जोशीशनाया, कियारा, मायरा, दीपिका, लक्ष्मी... ही सगळी नावं सध्या प्रेक्षकांच्या तोंडी आहेत. दोघांमध्ये आलेली ही ‘तिसरी’ टीव्हीवर सध्या चर्चेत आहे. तिच्या येण्यानं मालिका मसालेदार होत आहेत. प्रेमाचा त्रिकोण असलेल्या मालिकांमधलं हे चित्र प्रेक्षकांना परचित आहे. ‘दोघात तिसरा...’ या रुजलेल्या ट्रेंडमध्ये एक मुद्दा मात्र ठळकपणे दिसून येतोय; तो म्हणजे ही तिसरी व्यक्ती महिला व्यक्तिरेखा आहे. जुन्या सिनेमांमध्ये ‘एक फुल दो माली’ असं असायचं. छोटा पडदा मात्र ‘दो फुल एक माली’वर चालताना दिसतोय. शेजाऱ्याच्या घरात काय सुरू आहे याबाबतचं कुतूहल हे मानवी स्वभावातच आहे.

'तुला पाहते रे' अकाली बंद होणार नाही: सुबोध भावे

मुंबई: अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली 'तुला पाहते रे' ही मालिका सध्या यशाच्या शिखरावर आहे. प्रेक्षकांची ही लाडकी मालिका लवकरच बंद होणार, अभिनेता सुबोध भावे ही मालिका सोडणार अशा बऱ्याच चर्चा गेले काही दिवस रंगल्या आहेत. परंतु, मालिकेत मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता सुबोध भावे याने मालिका सुरूच राहणार असं सांगत चाहत्यांना खुशखबर दिली आहे. सुबोध भावेने ट्विटरच्या माध्यमातून या सर्व चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केलंय. 'ज्या मालिकेने मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिला.

गेली लेखिका कुणामुळे?

कल्पेशराज कुबललोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका टीव्ही इंडस्ट्रीत सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सुरुवातीपासून या मालिकेसाठी लेखन करणाऱ्या लेखिका रोहिणी निनावे यांनी या मालिकेला अचानक रामराम ठोकला आहे. लेखिका म्हणून आपल्याला हवं तसं स्वातंत्र्य मिळत नसल्यानं मालिका सोडत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर निनावे यांना मालिका सोडायची होती, त्यामुळे त्यांनी ती सोडली असावी, असा चॅनेलचा दावा आहे.रोहिणी निनावे यांनी मालिकेसाठी लेखन करत असताना त्यात अभिनयही केला होता. मालिकेतली गॅरी, शनाया, राधिका, केड्या ही सगळी पात्रं प्रेक्षकांची आवडती आहेत.

Sara Khan: 'बिदाई'च्या अभिनेत्रीला लीप सर्जरी महागात?

मुंबई 'बिदाई' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री सारा खान उर्फ साधना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. साराने इन्स्टाग्रामवर शस्त्रक्रिया केलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत साराचे होट आधीपेक्षा खूपच मोठे दिसत आहे. या शस्त्रक्रियामुळे सोशल मीडियावर सारा चांगलीच ट्रोल झाली आहे. या सर्व प्रकारामुळे साराला स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. मी शस्त्रक्रिया केली असून मला चांगले वाटत आहे. तसे मी आनंदी आहे. माझी ओठाची शस्त्रक्रिया चुकीची झाली आहे, असे म्हटले जात आहे. परंतु, ते चुकीचे आहे. मी लिप फिलर्सचा वापर केला आहे. ही लिप सर्जरी नाहीय.

ईशा- विक्रांतच्या लग्नाची 'लाख'मोलाची पत्रिका

मुंबई: झी मराठीवर सध्या 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. मालिकेत विक्रांत आणि ईशाच्या लग्नाची लगबग सुरू असताना चर्चा रंगलीय ती या जोडीच्या शाही लग्नपत्रिकेची. ही शाही आमंत्रण पत्रिका तब्बल दीड लाखांची आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांच्या शाही लग्नसोहळ्याची शाही लग्नपत्रिका लग्नपत्रिका चांदीच्या पत्र्यावर कोरलेली आहे. पत्रिकेसोबत एक सोन्याचा गणपती, चांदीचा करंडा, अत्तरदाणी, दिवा आणि मोती अशा भेटवस्तूदेखील आहेत. इतकंच नव्हे तर लग्नाच्या आमंत्रणासोबत आमंत्रकांना पोशाख आणि काही भेटवस्तू देखील देण्यात येणार आहेत.