पहिला 5G स्मार्टफोन ५ एप्रिलला लाँच होणार

नवी दिल्ली :जगातला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन गॅलक्सी फोल्ड लॉंच केल्यानंतर कोरियन स्मार्टफोन बनवणारी सॅमसंग कंपनी आता जगातला पहिला 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. सॅमसंग गॅलक्सी एस १० फाईव्हजी हा नवा स्मार्टफोन सॅमसंग कंपनी ५ एप्रिल रोजी दक्षिण कोरियात लाँच करणार आहे. मात्र भारतात हा स्मार्टफोन केव्हा लाँच होईल याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण कोरियात लाँच होणारा फाईव्हजी स्मार्टफोन संयुक्त राष्ट्रात सुद्धा लाँच होण्याची शक्यता आहे. फाईव्हजी नेटवर्क आणि कनेक्टीव्हीटी मिळवणाऱ्या पहिल्या देशामध्ये संयुक्त राष्ट्र आणि दक्षिण कोरियाचा सामावेश आहे.

दूरसंचार ग्राहकांची ग्राहकसंख्या १२० कोटींवर

वृत्तसंस्था, नवी दिल्लीदेशातील दूरसंचार ग्राहकांच्या संख्येने तिसऱ्यांदा १२० कोटींचा आकडा पार केला आहे. दूरसंचार नियामक 'ट्राय'च्या एका अहवालानुलार ग्राहकसंख्येत वाढ होण्यासाठी रिलायन्स जिओ, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि एअरटेल या कंपन्या कारणीभूत ठरल्या आहेत. या तिन्ही कंपन्यांनी जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात ग्राहक जोडले.'ट्राय'च्या जानेवारी २०१९च्या अहवालानुसार देशातील दूरसंचार ग्राहकांची संख्या डिसेंबर २०१८मध्ये ११९.७९ कोटी होती. ती जानेवारी २०१९मध्ये वाढून १२०.३८ कोटींवर पोहोचली. दरमहा आधारावर एकूण ग्राहकसंख्येच ०.४९ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

शाओमीच्या 'या' फोनवर २ हजाराचा डिस्काउंट

नवी दिल्ली शाओमीचा स्मार्टफोन Poco F1 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना आहे. कंपनीने या फोनवर २ हजार रुपयांचा डिस्काउंट ऑफर दिली आहे. ग्राहकांना या ऑफर्सची संधी २५ मार्च ते २८ मार्च या दरम्यान मिळणार आहे. हा फोन डिस्काउंटसह फ्लिपकार्ट आणि एमआय.कॉम या साइटवरून खरेदी करता येऊ शकणार आहे. शाओमीचा Poco F1 ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. या फोनवर २ हजारांचा डिस्काउंट देण्यात येणार आहे. तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनवर ३ हजारांचा कॅशबॅक दिला जात आहे.

कोड्याआडून व्हॉट्सअपवर निवडणूक प्रचार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी अनोखे फंडे वापरले जात असून, व्हॉट्सअपवर विविध प्रकारची कोडी टाकली जात आहेत. या कोड्याचे उत्तर कोणताही आकडा निवडला तरी ठराविक एका पक्षालाच कौल मिळत आहे. या उत्तरामुळे व्हॉट्सअप युजर्स संभ्रमात पडले आहे.निवडणुका आल्या की, उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कोणत्याही फंडे वापरण्यास मागे पुढे पाहत नाहीत. एका पक्षाच्या कार्यकत्यांनीही नामी शक्कल लढवली असून, व्हॉट्सअपवर विविध प्रकारची कोडी तयार करुन टाकण्याचे काम त्याच्याकडे देण्यात आले आहे. आपण केलेली आकडेमोड आपण कुणाला मत द्यावे हे योग्य तऱ्हेने सांगेल, असे या कोड्यात सांगण्यात आले आहे.

शाओमीच्या 'रेडमी गो' चा आज पहिला सेल

नवी दिल्ली शाओमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असलेला 'रेडमी गो' हा स्मार्टफोन नुकताच दिल्लीत लाँच करण्यात आला आहे. शाओमीचा हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे, असा कंपनीने दावा केला आहे. या फोनचा पहिला सेल आज होणार आहे. आज दुपारी १२ वाजेपासून फ्लिपकार्ट, एमआय होम आणि एमआय या स्टोरमधून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 'रेडमी गो' चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आलेला आहे. शाओमीचा हा अँड्रॉयड गो स्मार्टफोन आहे. अँड्रॉयड गो हा ऑरियोचा लाइट व्हर्जन मानला जात आहे. चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या या फोनमध्ये १ जीबी रॅम ८ जीबी इंटरनल स्टोरेजसह स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर देण्यात आला आहे.