फोन ठेवा दूर

मुंबई टाइम्स टीम स्मार्टफोन आता आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. ऑफिसचं काम असो, एखादी महत्त्वाची तारीख लक्षात ठेवणं असो किंवा थोडा टाइमपास करायचा असो, आपलं प्रत्येक काम स्मार्टफोनद्वारे होतं. यामुळे आपली स्मरणशक्ती कमी होत चालली आहे, याची अनेकांना जाणीव नसते. ऋतूमधील बदलागणिक निर्माण होणाऱ्या शारीरिक व्याधी आणि थकवा येण्याचं प्रमाणही पूर्वीपेक्षा अधिक वाढलं आहे. या सगळ्यासाठी वातावरण किंवा इतर गोष्टींना जबाबदार धरण्यापूर्वी आपला स्मार्टफोन तर यासाठी कारणीभूत नसेल ना, याचा विचार आपण केला आहे का?

खोकला साधा की जीवघेणा?

अनेकदा सभोवताली खोकताना अनेकजण दिसतात. बोलताना सुद्धा अनेकाना वारंवार खोकला येतो. काही तरी गोळ्या औषधे घेऊन खोकल्यावर उपाय केला जातो. परंतु, त्याच्या मुळापर्यंत कोणीच जात नाही. हाच खोकला तीन आठवडे महिन्यापेक्षा अधिक काळ येत असेल तर निश्चितच साधा वाटणारा खोकला हा जीवघेणा ठरण्याची भीती वैद्यकतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. पुणेः कटट्यावर बसल्यानंतर नेहमीप्रमाणे बाळासाहेबांनी चहाचा कप घेतला. चहा पिता पिता त्यांना अचानक खोकल्याची उबळ आली. तसा त्यांनी चहा बाजूलाच ठेवला. अनेक दिवस त्यांना खोकला होता. परंतु, काही तरी थातूरमातूर औषध घेऊन तो बरा होईल असे वाटायचे. पण तो काही बरा होईनासा झाला.

काळजी ‘डायबेटिक फूट’ची

ऑफिसमध्ये बरेच तास एका जागी बसून काम करून, जंक फूड आणि बदललेली जीवनशैली ही टाइप-२ डायबेटिसची प्रमुख कारणं असल्याचं समोर आलं आहे. रक्तातली साखर कमी झाल्याने मज्जातंतूचं नुकसान होऊन मज्जासंस्थेला हानी पोहोचते. हे घडतं तेव्हा पायाच्या नसा आक्रसल्या जातात; कारण पायापर्यंत रक्ताभिसरण व्यवस्थित पोहोचू शकत नाही. डायबेटिक फूट या आजाराची माहिती नसल्याने भारतात ५० हजार पेशंटचे पाय कापावे लागतात. रक्तातली साखर कमी झाल्यावर पायाची जखम चिघळून ती भरण्यास वेळ लागतो. आपण कुठल्या प्रकारच्या चपला वापरता यावरही डायबेटिस अवलंबून आहे.

मधुमेहाला ठेवा नियंत्रणात

आहार, व्यायाम, विश्रांती यांची योग्य सांगड घालणारी जीवनशैली आचरणात आणली आणि आयुष्यभर ती कायमची बाणवली, तर मधुमेह नक्कीच नियंत्रणात ठेवता येईल. मधुमेह हा आजमितीचा खूप सामान्य आजार झाला आहे. मधुमेही रुग्णांच्या संख्येत चीनच्या खालोखाल जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. आपल्या देशात आज असलेल्या ८ कोटी मधुमेहींचा आकडा येत्या २० वर्षांत १३ कोटीपर्यंत जाईल, असा हैदराबादच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ’चा होरा आहे. मधुमेहाच्या नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती आणि सर्वसामान्यांमध्ये जाणीव निर्माण करण्याची सध्या गरज आहे.

चिल्लरपार्टीसाठी झटपट पौष्टिक खाऊ

मुंबई टाइम्स टीम फास्ट फूड असूनही पौष्टिक असणारा बर्गर, लहानग्यांना आवडणारे नूडल्स, फळांच्या हटके फ्लेव्हर्सचा ज्यूस अशा वैविध्यपूर्ण आणि झटपट होणाऱ्या पदार्थांच्या पाककृती शिकण्याची संधी ‘मॉम अॅण्ड किड्स पाच मिनिट्स स्नॅक्स कुकिंग’ या कार्यशाळेत मिळणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ आयोजित रविवार १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या कार्यशाळेत झटपट रेसिपींचे धडे गिरविता येणार आहेत. १४ नोव्हेंबर रोजी असलेल्या बालदिनानिमित्त ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. पोळीभाजीपेक्षा फास्ट फूड, चमचमीत पदार्थांचीच मागणी लहान मुलांकडून केली जाते.