पेन, मार्श ऑस्ट्रेलिया संघात

यष्टिरक्षक फलंदाज टिम पेन, फलंदाज कॅमेरून बँनक्रॉफ्ट व शॉन मार्श यांची २३ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ऍशेस कसोटी सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. या तिघांना मॅथ्यू वेड, मॅट रेनशॉ व ग्लेन मॅक्सवेल यांच्या जागी स्थान देण्यात आले आहे. वडिलांच्या निधनामुळे अष्टपैलू मार्कुस स्टोईनिस याचा विचार करण्यात आलेला नाही. २०१० साली स्टीव स्मिथ व टिम पेन यांनी पाकविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. यानंतर पेनला मिळालेल्या अल्प संधींचा फायदा उठविता न आल्याने संघाचा नियमित सदस्य बनता आले नाही तर दुसरीकडे स्मिथने गोलंदाजीकडून फलंदाजीकडे मोर्चा वळविताना संघातील स्थान भक्कम केले.

वाद ‘पद्मावती’चा

संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ चित्रपटावरून उसळलेला विवाद दिवसेंदिवस गंभीर रूप घेत चालला आहे. भन्साळींवरील हल्ल्यासाठी पाच कोटींचे बक्षीस जाहीर करण्यापासून अभिनेत्री दीपिका पडुकोनचे नाक कापण्याची धमकी देण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे. यापूर्वी कोल्हापुरात या चित्रपटाचा सेट जाळण्यात आला होता, त्यामुळे अशा प्रकारच्या धमक्या गांभीर्याने घेऊन सरकारने अशा फतवेखोरांवर सर्वप्रथम कारवाई केली पाहिजे.

ग्रामीण भागात आरोग्य सुविधा सक्षम करणार

>> आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती
>> जानेवारीत नवीन साधनसामग्री
राज्यातील ग्रामीण भागातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे व सामाजिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. पहिल्या टप्प्यात एक्स रे मशीन, अल्ट्रासाऊंड, हाय पॉवर एक्स रे मशीन, कलर डॉप्लर, रक्त तपासणीसाठी यंत्रणा उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पर्वरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.

खाण घोटाळा : यदुवंशी यांची दिगंबर कामत विरोधात जबानी

भारतीय नागरी सेवेतील अधिकारी (आयएएस) तथा राज्याचे माजी खाण सचिव राजीव यदुवंशी यांनी कोट्यवधी रुपयांच्या खाण घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या विरोधात काल जबानी दिल्याने कामत यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, एसआयटीने माजी प्रधान खाण सचिव राजीव यदुवंशी यांना खाण घोटाळा प्रकरणी सरकारी साक्षीदार बनविले आहे.