नायलॉन मांजात अडकलेल्या कोकिळ पक्ष्याची केली सुखरुप सुटका

गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नायलॉन मांजात अडकलेल्या एका कोकीळ पक्ष्याची सुटका करण्यात आली.

‘सीए’मध्ये मुलींचाच दबदबा

‘आयसीएआय’तर्फे (द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडिया) ‘सीए’ अंतिम वर्षांच्या नवीन व जुना अभ्यासक्रम, ‘फाऊंडेशन’ परीक्षा व ‘सीपीटी’चा (कॉमन प्रोफिशिएन्सी टेस्ट) निकाल जाहीर करण्यात आला.

नागपूर मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयासाठी दोन कोटी : पालकमंत्र्यांची घोषणा

महापालिकेच्या रुग्णालयांनी अनेक पिढ्यांना उपचार देत नवजीवन दिले आहे. एकेकाळी खासगी रुग्णालयांची एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्धता नसताना महापालिकेच्या रुग्णालयांनीच गरीब, मध्यमवर्गीय नागरिकांना संजीवनी देण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. अनेकांचे आयुष्य वाचविणाऱ्या महापालिकेच्या रुग्णालयांची अवस्था आता वाईट असून या रुग्णालयांचेच जीवन वाचविण्याची वेळ आली आहे. इंदिरा गांधी रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी नागपूर महापालिकेने पुढाकार घेतला असून या रुग्णालयात नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी अत्याधुनिक उपकरणे असणे आवश्यक आहे.

इंजिनियरिंगमध्ये प्रवेशाच्या नावावर विद्यार्थिनीची फसवणूक

इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका विद्यार्थिनीची फसवणूक करण्यात आली.

नागपूरच्या वाचन चळवळीचा आधारवड हरपला : मुकुंद नानिवडेकर अनंतात विलीन

सीताबर्डीच्या राजाराम दीक्षित वाचनालयाचे सचिव व भारतीय रिझर्व्ह बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी मुकुंद नानिवडेकर यांचे मंगळवारी उशिरा रात्री निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या ५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून राजाराम वाचनालयाशी जुळलेल्या नानिवडेकर यांनी वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचले. त्यामुळे त्यांच्या निधनाने वाचन चळवळीचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.